Shirdi Saibaba Kakad Aarti Marathi – Morning Arati – Sunrise Harathi

Sai Baba Morning Aarti starts at 5:00 AM Every Day.

Click Here for Saibaba Kakad Aarti Meaning in English

 ॥ Shirdi Sai Baba Kakada Aarati in Marathi ॥

शिर्डी साई बाबा की सुबह की आरती

: कांकड़ आरती प्रात: 4:30 बजे

श्री सच्चिदानन्द समर्ध सद्गुरु सायिनाध महराज् की जै.

1.भूपाळी

(संत तुकाराम इस आरती के रचनाकार )

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंती माझी सदुरुनाथा ॥ 1 ॥
असो नसो भाव आलों तूझिया ठाया । कृपादृष्टीं पाहें मजकडे सदुरुया ॥ 2 ॥
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी । सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ॥ 3 ॥
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी । नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी ॥ 4 ॥

2. भूपाळी

उठा पांडुरंगा आतां प्रभातसमयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ 1 ॥
गरुडपारापासुनी महाद्घारापर्यंत । सुरवरांची मांदी उभी जोडूनियां हात ॥ 2 ॥
शुकसनकादिक नारद-तुबंर भक्तांच्या कोटी । त्रिशूल डमरु घेउनि उभा गिरिजेचा पती ॥ 3 ॥
कलीयुगींचा बक्त नामा उभा कीर्तनीं । पाठीमागें उभी डोळा लावुनियां जनी ॥ 4 ॥

3. भूपाळी

उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा । आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥ ध्रु0 ॥
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया । परि ही अज्ञानासी तुमची भलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया । तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ॥ चा0 ॥
भो साइनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी । अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी ॥ चा0 ॥
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ॥ आधि0 ॥ उठा0 ॥ 1 ॥
बक्त मनीं सद्घाव धरुनि जे तुम्हां अनुसरले । ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्घारि उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धालें । परि त्वद्घचनामृत प्राशायातें आतुर झालें ॥ चा ॥
उघडूनी नेत्रकमला दीनबंधु रमाकांता । पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप साइनाथा ॥ चा0 ॥
आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितों देवा । सहन करिशिल तें ऐकुनि घावी भेट कृष्ण धांवा ॥  उठा उठा0 ॥ आधिव्याधि0 ॥ 2 ॥

4. भूपाळी

उठा पांडुरंगा आतां दर्शन घा सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ 1 ॥
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा । सोडा शेजे सुख आतां बंघु घा मुखकमळा ॥ 2 ॥
रंगमंडपी महाद्घारीं झालीसे दाटी । मन उतावीळ रुप पहावया दृष्टी ॥ 3 ॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊं घा दया । शेजे हालवुनी जागें करा देवराया ॥ 4 ॥
गरुड हनुमंत उभे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट ॥ 5 ॥
झालें मुक्तद्घार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा ॥ 6 ॥

See Also  1000 Names Of Sri Shirdi Sainatha Stotram 2 In Gujarati

5. अभंग

घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ॥ करुं साई सी0 ॥ 1 ॥
उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ॥ सांई र0 ॥ ओं 0 ॥ 2 ॥
करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ॥ साईंचें हें0 ॥ पा0 ॥ 3 ॥
कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं ॥ साई तु0 ॥ जडो0 ॥ 4 ॥

6. कांकंड आरती

कांकडआरती करीतों साईनाथ देवा । चिनमयरुप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ॥ ध्रु0 ॥
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला । वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजवीला ।
साईनाथगुरुभक्तिज्वलनें तो मी पेटविला । तद्वृत्ती जाळुनी गुरुनें प्रकाश पाडिला ।
द्घेत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरुपीं जीवा ॥ चि0 ॥ 1 ॥
भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहरसी । तोचि दत्तदेव तू शिरड़ी राहुनी पावसी ।
राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धांवसी । निरसुनियां संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ॥ चि0 ॥ 2 ॥
त्वघशदुंदुभीनें सारें अंबर हेंकोंदलें । सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनि त्वद्घचनामृत अमुचे देहभान हरपलें । सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करुनियां साईमाउले दास पदरिं ध्यावा ॥ चि0 ॥ कां0 चि0 ॥ 3 ॥

7. कांकंड आरती ( पंढरीनाथा )

भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ॥ 1 ॥
ओंवाळूं आरती माइया पंढरीनाथा माझ्या साईनाथा । दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥ ध्रु0 ॥
काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती । कोटी ब्रहमहत्या मुख पाहतां जाती ॥ 2 ॥
राही रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं । मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायींचे ठायीं ॥ 3 ॥
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा । विठेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ 4 ॥ ओवाळूं 0 ॥

See Also  Sri Sai Sakara Ashtottara Shatanamavali In English

8. पद (उठा उठा)

उठा साधुसंत साधा आपुलालें हित । जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ॥ 1 ॥
उठोनियां पहांटे बाबा उभा असे विटे । चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टि अवलोका ॥ 2 ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राइळासी । जळतिल पातकांच्या राशी कांकंडआरती देखिलिया ॥ 3 ॥
जागें करा रुक्मिणीवर, देव आहे निजसुरांत । वेंगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ॥ 4 ॥
दारीं वाजंत्रीं वाजती ढोल दमामे गर्जती । होते कांकडआरती माइया सदगरुरायांची ॥ 5 ॥
सिंहनाद शंखभेरी आनंद होतो महाद्घारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ॥ 6 ॥

भजन

साईनाथगुरु माझे आई । मजला ठाव घावा पायीं ॥
दत्तराज गुरु माझे आई । मजला ठाव घावा पायीं ॥
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज क जय ॥

9.श्री सांईनाथ प्रभाताष्टक

प्रभातसमयीं नभा शुभ रवि प्रभा फांकली । स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ॥
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 1 ॥
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता । परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ॥
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 2 ॥
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा । तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ॥
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 3 ॥
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी । कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ॥
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 4 ॥
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे । त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ॥
अजातरिपु सदगुरु अखिलपातका भंजना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 5 ॥
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले । वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ॥
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 6 ॥
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा । न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ॥
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 7 ॥
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा । समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ॥
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ॥ 8 ॥

See Also  1000 Names Of Sri Shirdi Sainatha Stotram 2 In Tamil

स्रग्धरा

प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं । त्यांचे चित्तासि देतों अखिल हरुनियां भ्रांति मी नित्य शांती ॥
ऐसें हें साईनाथें कथुनि सुचविलें जेविं या बालकासी । तेवीं त्या कृष्णपायीं नमुनि सविनयें अर्पितों अष्टकासी ॥ 1 ॥
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय ॥

10. पद

सांई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ॥ धु0 ॥
जाना तुमने जगत्पसारा, सबही झूठ जमाना ॥ साई0 ॥ 1 ॥
मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना ॥ साई0 ॥ 2 ॥
दास गनू कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ॥ साई0 ॥ 3 ॥

11. पद

रहम नजर करो, अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई ॥ धु0 ॥
मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा ॥ मैं ना जानूं अल्लाइलाही ॥ 1 ॥
खाली जमाना मैंने गमाया, साथी आखिर का किया न कोई ॥ 2 ॥
अपने मस्जिद का झाडू गनू है । मालिक हमारे, तुम बाबा साई ॥ 3 ॥

12. पद

तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी, मी दुबली बटिक नाम्याची जाण श्रीहरी ।
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी, तूं जगन्नाथ, तुज देऊँ कशी रे भाकरी ।
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता । श्रीकांता ।
माध्यान्हरात्र उलटोनि गेली ही आतां । आण चित्ता ।
जा होईल तुझा रे कांकडा ही राउळांतरीं । आणतील भक्त नैवेघ हीनानापरी ॥

13. पद

4. श्री सदगुरु बाबासाई तुजवांचुनि आश्रय नाही, भूतली ॥ धु0 ॥
मी पापी पतित धीमंदा । तारणें मला गुरुनाथा, झडकरी ॥ 1 ॥
तूं शांतिक्षमेचा मेरु । तूं भवार्णवींचें तारुं, गुरुवरा ॥ 2 ॥
गुरुवरा मजसि पामरा, अता उद्घरा, त्वरित लवलाही, त्वरित लवलाही,
मी बुडतों भवभय डोही उद्घरा ॥ श्री सदगु0 ॥ 3 ॥

– Chant Stotra in Other Languages –

Sri Shirdi Sai Baba – Kakad Aarti – Morning Aarthi in SanskritEnglishBengaliGujaratiKannadaMalayalamOdiaTeluguTamil